Belagavi

बिबट्याच्या पाठलागाला आज महिना पूर्ण; पण अजूनही बिबट्याचा चकवाच ! 

Share

बेळगावात प्रशासनासह लोकांची झोप उडवून टाकलेल्या बिबट्याच्या पाठलागाला आज महिना पूर्ण झाला. तब्बल 31 दिवस शोधमोहीम राबवूनदेखील बिबट्याने वन खाते आणि पोलिसांना चक्रवाच दिला आहे. दरम्यान, आज 31व्या दिवशीही बिबट्यासाठी गोल्फ कोर्स परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.  

 

होय, ऑपरेशन बिबट्याला आज 31 दिवस पूर्ण झाले आहेत. गेल्या आठवड्याभरापासून, शिमोग्याहून आणलेल्या ‘अर्जुन’ आणि ‘आले’ या हत्तींवर बसून शार्पशूटर बिबट्याचा शोध घेत आहेत. आजही गोल्फ कोर्समध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. वनविभाग आणि पोलीस कर्मचाऱ्यांची संयुक्त कारवाई सुरू असून, दोन हत्ती, 7 शार्प शूटरसह शेकडो जवान कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.

 

गेल्या आठवडाभरापासून बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसलेला नाहीय. त्यामुळे आता हे शेवटच्या टप्प्यातील कोम्बिंग ऑपरेशनची असण्याची शक्यता आहे. उद्यापासून ही कारवाई सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय वनविभागाचे अधिकारी घेणार आहेत. गेल्या आठवडाभरापासून शेतातील झाडांमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या दिसलेला नाही. त्यामुळे गोल्फ कोर्स परिसरातून बिबट्या निघून गेला असावा, असा अंदाज आहे. मात्र, आज कसून शोधमोहीम राबवून मगच उद्या याबाबतचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

Tags:

#bibthyabelgaonkar #belgaumleoperd