कुणी सिंहासनाधिष्ठित तर कुणी श्रीकृष्ण रुपातला, तर कुणी आपल्यासारखाच खोडकर, खेळकर बालगणेश साकारला. विविध रंगरूपातला आपल्या भावविश्वातला बाप्पा रेखाटण्यात चिमुकले अगदी दंग झाले होते. निमित्त होते बेळगावात आज झालेल्या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे.
होय, रोटरी क्लब, बेळगाव उत्तर आणि गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यम शाळेच्या वतीने बेळगावात आज, रविवारी गणेशोत्सवानिमित्त शालेय विध्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. गणेशाचे चित्र रेखाटणे हा स्पर्धेचा विषय होता. बेळगाव शहर आणि परिसरातील विविध माध्यमांच्या शाळांच्या एलकेजी ते बारावीपर्यंतच्या 900 विध्यार्थ्यानी या स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊन आपल्या संकल्पनेतील गणेश समरसून साकारला.

यासंदर्भात माहिती देताना रोटरी क्लब, बेळगाव उत्तरचे अध्यक्ष जी. एस. पाटील म्हणाले, गणेशोत्सवानिमित्त आम्ही या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे. विध्यार्थ्यांना त्यांच्या चित्रकला प्रतिभेला वाव देण्याचा हेतू यामागे आहे. यात विविध शाळांच्या एलकेजी ते बारावीपर्यंतच्या 900 विध्यार्थ्यानी घेतला आहे. उत्तम भविष्य निर्माण करण्यासाठी विध्यार्थ्यांना ही स्पर्धा उपयोगी ठरावी ही अपेक्षा आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यम शाळेच्या वर्षा यांनी सांगितले की, मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी आमच्या शाळेत रोटरी क्लबतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. त्याला प्रतिसादही चांगला मिळतो. यावेळी 900 विध्यार्थ्यानी भाग घेतला आहे. मुलांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही रोटरी क्लबचे ऋणी आहोत.
यावेळी गजाननराव भातकांडे इंग्लिश माध्यम शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्य, शिक्षक आदी उपस्थित होते.


Recent Comments