Belagavi

बेळगावात गणेशोत्सव मंडळांना सावरकरांच्या प्रतिमा भेट

Share

आमदार अनिल बेनके यांनी आज बेळगाव शहरातील उत्तर मतदार संघातील गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन सावरकरांचे फोटो, बॅनर आदी वाटप करून गणेशोत्सव भव्य पद्धतीने साजरा करण्यास सांगितले.

होय, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी आज आपल्या मतदारसंघातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमा आणि बॅनरचे वाटप केले. यावेळी चव्हाट गल्ली येथील क्रांतिवीर नाना पाटील चौकातील गणेश मंडळांला आ. अनिल बेनके यांच्या हस्ते सावरकर व टिळकांचे चित्र व बॅनर देण्यात आला. यावेळी गणेशमूर्ती व सावरकर यांच्या प्रतिमेस त्यांनी पुष्पहार अर्पण करून पूजा केली.

यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना आ. अनिल बेनके म्हणाले, बेळगाव उत्तर मतदारसंघातील सार्वजनिक उत्सव मंडळांना भेट दिली आणि सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करणाऱ्या सावरकर आणि टिळकांच्या प्रतिमांचे वाटप केले. सावरकरांचे चित्र असलेले सुमारे 10 हजार टी-शर्ट्स आम्ही वितरित करत आहोत. मुंबईपाठोपाठ देशातील बेळगावात गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. दक्षिण भारतात प्रथमच बेळगाव शहरात भव्य गणेशोत्सव साजरा होत आहे. बेळगावातील गणेशोत्सवाला यंदा 126 वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. सावरकरांचे 200 फोटो आणि 10 हजार टी-शर्ट आणि बॅनर मंडळांना देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

एडीजीपी अलोककुमार यांच्या फोटो लावण्याकरता परवानगी अनिवार्य आहे या विधानाला उत्तर देताना बेनके  म्हणाले की, जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी घ्यावी लागली तर तुम्ही उत्सव साजरा करू शकणार नाही. कधीकधी परवानगी आवश्यक नसते. त्यांनी इतरांसाठी कायदे का केले नाहीत. ते फक्त आमच्यासाठीच कायदे का करतात? प्रत्येक गोष्टीसाठी परवानगीच घ्यायची असेल तर सण का करायचे, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला कोणत्याही परवानगीची गरज नाही. आपण जे योग्य करतो तेच करतो. यामध्ये कोणीही हस्तक्षेप करण्याची गरज नाही. सर्व गणेश मंडळांनी आधीच निर्णय घेतला आहे. आम्ही गणेशोत्सव भव्य प्रमाणात साजरा करणारच असे त्यांनी सांगितले. बाइट

एकंदरीत, बेळगावातील गणेश मंडळांना सावरकरांचे चित्र आणि बॅनर वाटपाचे काम जोरात सुरू आहे. फोटो लावण्यासाठी परवानगी घ्यावी, या पोलिस खात्याच्या म्हणण्यापेक्षा मोठ्या थाटात, शांततेत गणेशोत्सव पार पडावा, हीच सर्वांची इच्छा आहे.

Tags:

#belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innews #inbelgaum #newskannada #livenews #inbelagavi #inkannada #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #mla #anilbenake #uttarkarnatakanews