Belagavi

पावसामुळे गणेशोत्सवात विघ्न – महामंडळाने दिली गणेश मंडपाला भेट…

Share

ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस पडत असून यामुळे श्री गणेशोत्सवात विघ्न आले आहे. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात पाण्याचा शिरकाव होऊन मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव महामंडळाने विविध भागात भेट देऊन पाहणी केली.

गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मार्कंडेय नगर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नगर पालिका अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून यावर तातडीने तोडगा काढण्याची विनंती केली.

 

याचप्रमाणे वंटमुरी कॉलनी येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मांडवात डोंगरावरून वाहत असलेल्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून हि समस्या सोडविण्याचा आग्रह केला आहे.

 

यावेळी महामंडळाचे मदन बामणे, सागर पाटील, विकास कलघटगी, महादेव पाटील, रमाकांत कोंडुसकर, गणेश दड्डीकर आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: