कर्नाटक भीम सेनेने चित्रदुर्गातील मुरुगा मठातील मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.
कर्नाटक भीमसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. चित्रदुर्गातील मुरघा मठात मुरघा शरण स्वामीजींकडून दलित समाजातील मुलींवर सातत्याने लैंगिक अत्याचार होत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. काही आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच अन्य आरोपींना अटक करण्यात यावी, कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, पीडित मुलींना न्याय द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी बोलताना कर्नाटक भीम सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत तळवार यांनी, लैंगिक अत्याचारप्रकरणी विविध संघटना आणि प्रसारमाध्यमांच्या दबावाला बळी पडून पोलिसांनी अटक केली आहे. मात्र उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.
यावेळी कर्नाटक भीमसेना जिल्हा उपाध्यक्ष भीमप्पा दोडमणी, जिल्हा सचिव लक्ष्मण पाटील, जिल्हा सरचिटणीस दीपा कांबळे, शशिकांत पुंडीपल्ले, खानापुर तालुकाध्यक्ष नझीम मुजावर, संतोष चितळे, दीपक कांबळे, महाबळेश्वर तल्लुर, चेतन कोलकार, गोपाल मादार आदी उपस्थित होते.


Recent Comments