Belagavi

मुरुघा शरण प्रकरणाची चौकशी जारकीहोळी मॉडेलमध्ये करावी; आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद

Share

मुरुघा शरण लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या सीडी प्रकरणाच्या धर्तीवर करण्यात यावा, तसेच गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.

व्हॉइस : चित्रदुर्ग येथील मुरुघा माठातील श्री शिवमूर्ती शरण यांच्यासंदर्भात समोर आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणासंदर्भात माजी मंत्री रमेश रमेश जारकीहोळी यांच्या सीडी प्रकरणाच्या धर्तीवर करण्यात यावा, तसेच गृहमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी तपास पथक स्थापन करावे, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केली आहे. राजकारण्यांसाठी एक कायदा आणि सर्वसामान्यांसाठी एक कायदा, हि वृत्ती ठेवणाऱ्या सरकारवर प्रशचिन्ह उपस्थित करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी भीमाप्पा गडाद यांनी दाखविली आहे. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्र्यांनी तपास पथक स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

 

२ मार्च रोजी रमेश जारकीहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणाची माहिती प्रसारमाध्यमांसमोर प्रसारित झाली. संपूर्ण देशाची लोकशाही व्यवस्था ठप्प होण्यासारखी हि बाब होती. परंतु पीडित तरुणीने वकिलांमार्फत तक्रार दाखल करण्यास विलंब झाला आणि त्यानंतर रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात एफआयआर दाखल झाली. पीडित युवतीने स्वत: न्यायाधीशांसमोर हजर राहून सीआरपीसी कलम १६४ अन्वये जबाब दिला मात्र सदर तरुणीवरील अत्याचाराला न्याय मिळाला नाही. या प्रकरणी रमेश जारकीहोळी यांनी १० मार्च २०२१ रोजी सरकारला पत्र लिहून सीडी प्रकरणातील कटाचे सत्य शोधण्यासाठी “विशेष तपास पथक” (एसआयटी) स्थापण्याची विनंती केली होती. त्याला, त्याचदिवशी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार ११ मार्च २०२१ रोजी सरकारने एसआयटी स्थापन करण्याचे आदेशही दिले.

 

आपल्या पक्षाच्या एका आरोपी मंत्र्याला कायद्यापासून वाचवण्यासाठी न्याय देण्यात आला नाही हि बाब अद्याप जनतेने विसरली नाही. परंतु या प्रकरणी तक्रार दाखल करताना स्वामीजींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्याची नोंद करण्यात आली असून मुरुघ शरण ला अटक करण्याची तयारीही करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला धक्का बसल्याचे मत भीमाप्पा गडाद यांनी व्यक्त केले आहे.

राज्यातील सर्वात प्रतिष्ठित मठांपैकी एक असलेल्या आणि शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या मुरुघ मठाचे श्री शिवमूर्ती शरण, कोणत्याही जाती-धर्माचा विचार न करता शिक्षण आणि भोजन देऊन देशाचा सांस्कृतिक वारसा चालवत आहेत, अशी त्यांची ख्याती आहे. प्रतिष्ठित स्वामी तसेच स्वामींवर एफआयआर नोंदविलेल्या गुन्ह्यात संशयाला वाव देणारी घटनाही समोर आली आहे, एस के मठाची प्रशासकीय मंडळी तसेच मुरुघ मठाचे प्रशासनाधिकारी एस के बसवराज यांनी षडयंत्र रचल्याचा संशय भक्तमंडळी उपस्थित करत आहेत.

 

ज्या तक्रारींमध्ये लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली जाते, त्यानुसार तक्रारीत नांव असलेल्या व्यक्तीवर एफआयआर नोंद केल्यानंतर सदर व्यक्तीच्या अटकेच्या कालावधीसाठी किंवा पोलीस कोठडीसाठी पोलीस विभागाचे कोणतेही नियम, मार्गदर्शक तत्वे, किंवा परिपत्रक नाही, अशी माहिती पोलीस मुख्यालयातून माहिती अधिकारांतर्गत मिळविण्यात आली आहे. त्यामुळे या पत्रातील सर्व मुद्दे तपासून या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.

Tags:

#basangoudapatilyatnal #belgavisuddi #bjpkarnataka #bsyaddurappa #cmbommaiah #dkshivakumar #inbelgaumnews #indiancongressparty #innewsbelagavi #innewskarnataka #jagadishshattar #kannadanews #karnatakacongress #karnatakanews #laxmihabbalkar #mbpatil #nalinkumarkattil #newslivekannada #Prajvi #praladjoshi #rameshjarakeholi #rameshkatti #satishjarakeholi #shiddaramayya #uttarkarnatakamandi #uttarkarnatakanews