Belagavi

कृष्णा नदीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला

Share

 

अथणी येथे श्रावण महिन्याच्या पूजेनिमित्त देवाला पाणी घेण्यासाठी आला असता चुकून कृष्णा नदीत पडून बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात एसडीआरएफ पथकाला यश आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील अथणी शहरातील कागजी गल्ली येथील सागर राजू होनकट्टी हा २३ वर्षांचा तरुण देवपूजेसाठी पाणी आणण्यासाठी कृष्णा नदीवर आंघोळ करण्यासाठी आला असता, हा अपघात झाला होता.

 

अथणी तालुक्यातील हल्याळ- दरुर पुलाजवळ हा अपघात झाला होता. पोहता येत असूनही नदीत बुडाल्यावर  पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे सागर वाहून गेला होता. त्याचा मृतदेह तालुक्यातील सत्ती गावात आढळून आला. एसडीआरएफच्या पथकाने कृष्णा नदीत बोटीतून अथक शोध मोहीम राबवून सागरचा मृतदेह नदीबाहेर काढण्यात यश मिळवले.

Tags: