बेळगाव येथील क्लब रोड येथे रस्ता ओलांडून नुकताच चकवा देऊन पळून गेलेला बिबट्या आज सकाळी पुन्हा निसटला. पाणी पिण्यासाठी तलावावर आला असता वन कर्मचाऱ्यांची चाहूल लागल्याने बिबट्याने तेथून पलायन केले.
होय, कुंदानगरी बेळगावात गेल्या २३ दिवसांपासून ठाण मांडून दहशत माजवलेला बिबट्या वनखात्याच्या अधिकाऱ्यांशी लपाछपी खेळत आहे.
आज सकाळी हिंडलगा गणपती मंदिराशेजारील अरगान तलावात पाणी पिण्यासाठी बिबट्या आला होता. याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ तेथे दाखल झाले. मात्र तोपर्यंत बिबट्या पुन्हा निसटला होता.
काल वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी हनीट्रॅपचा विचार चालवला होता. पण तोही व्यवहार्य नसल्याने मागे पडल्याचा अंदाज आहे.


Recent Comments