आपल्या आयुष्यात डोळ्यांना खूप महत्व आहे. कायद्यात देखील एव्हिडन्स ऍक्ट च्या कलम ३ नुसार प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्वपूर्ण मनाली जाते. यामुळे प्रत्येकाने आपल्या डोळ्यांची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्ला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश पवनेश डी यांनी दिलाय.
अलायन्स क्लब बेळगाव स्मार्ट सिटी, वकील संघटना, राज्य सरकारी एनपीएस कर्मचारी संघटना, राज्य न्याय विभाग कर्मचारी संघटना, न्यायिक कर्मचारी सहकारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदर्शन फाऊंडेशन व नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उदघाटन जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रभारी न्यायाधीश पवनेश डी यांच्याहस्ते पार पडले. देवाने आपल्याला दृष्टी दिली आहे. हि दृष्टी टिकवून ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हे सुंदर जग पाहण्यासाठी आपल्याकडे डोळे आहेत. दृष्टी असूनही आपल्याकडून जे काम होत नाही ते काम सतर्कतेने दृष्टिहीन लोक करू शकतात. आज न्यायालयाच्या आवारात न्यायिक सेवेत कार्यरत असणाऱ्यांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, शिबिराच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलचे डॉ. सचिन माहुली आणि अलायन्स क्लब बेळगाव स्मार्टसिटीच्या शिल्पा यांनी स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त वकील, न्यायालयीन कर्मचारी आणि जनतेला लाभ मिळावा या उद्देशाने आयोजिण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिराची माहिती दिली. (
यावेळी नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी नेत्रतपासणी करून शेकडो लोकांना डोळ्यांच्या आरोग्याबद्दल मार्गदर्शन केले. या शिबिराला डॉ.श्रेया रायकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी, सनदी जिल्हा गव्हर्नर दिनकर शेट्टी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments