बेळगावातील चन्नम्मा नगरातील वॉकर्स ग्रुपच्या वतीने सुभाषचंद्र नगरातील नागरिक संघटनेच्या सभागृहात सभा घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
चन्नम्मा नगरातील वॉकर्स ग्रुपच्या वतीने सुभाषचंद्र नगरातील नागरिक संघटनेच्या सभागृहात झालेल्या सभेत डॉ. मिलिंद हलगेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उद्योजक अप्पासाहेब गुरव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सभासदांच्या हिताच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रामपाल शर्मा, विजय कौशिक, व्ही. ए. लोखंडे, एस. आर. यरगबळीमठ, अशोक कल्याणकर, उमेश नाडकर्णी, बी. बी. शहा, अशोक संगण्णावर, एस. एस. हेगडे, एच. एम. बोन्द्रे, एस.
के. यादगिरी, एम. के. खंडोजी, प्रभाकर देसाई यांच्यासह वॉकर्स ग्रुपचे 50 सभासद उपस्थित होते.


Recent Comments