बेळगावात बिबट्या आढळल्याच्या घटनेला आज २१ दिवस पूर्ण झाले आहेत. गोल्फ कोर्सवर फिरणारा बिबट्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लपाछपी खेळत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी विविध कसरती करणाऱ्या वनविभागाने आता चक्क ‘हनीट्रॅप‘द्वारे बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला आहे.
होय, बेळगावात बिबट्याने खरोखरच मोठी दहशत निर्माण केली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शिमोगा जिल्ह्यातील सकरेबैलू हत्ती कॅम्पमधील ‘आले’ आणि ‘अर्जुन’ या दोन हत्ती बेळगावात दाखल झाले आहेत. त्यांनी गेले दोन दिवस मोहिमेत भाग घेतला.
मात्र बिबट्या काही पकडला गेला नाहीय. त्यामुळे जनतेमध्ये आणखी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसरी रणनीती आखत हनीट्रॅपद्वारे बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


Recent Comments