Belagavi

धर्मस्थळ ग्रामविकास संघाचे ग्रामीण आमदारांनी केले कौतुक

Share

एका शासनाप्रमाणे धर्मस्थळ ग्रामविकास संघाच्या माध्यमातून योजना कार्यान्वित होत असून डॉ. वीरेंद्र हेगडे यांच्याकडून उत्तम कार्य केले जात असल्याबद्दल आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कौतुक केले.

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना बेळगाव तालुका बी विभागातील कंग्राळी खुर्द येथील रामकृष्ण हरी कल्याण मानतात सभाभवनात कंग्राळी बीके, अगसगा, सदाशिव नगर, कंग्राळी के एच गावातील स्वसहाय संघांच्या संयुक्त विद्यमाने १२५ दाम्पत्यांच्या उपस्थितीत सामूहिक सत्यनारायण पूजा आणि संघाचे उद्घाटन तसेच धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी धर्मस्थळ ग्रामविकास संघातर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचे त्यांनी कौतुक केले. डॉ. वीरेंद्र हेगडे यांच्या आवाहनानुसार तलाव खोदकाम, व्यसनमुक्ती शिबिर, शिक्षण, सेवा यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमांमुळे समाज सुधारत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच सरकारने करायला हवे ते काम धर्मस्थळ संघाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी कौतुक केले.()

या कार्यक्रमास स्वामी मोक्षात्मानंद स्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून कल्लगौड पाटील, सुरेख पाटील आदी उपस्थित होते. तसेच जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी, योजना अधिकारी नागराज हद्दी, धारवाड प्रादेशिक संचालक दुग्गेगौडा, समन्वयाधिकारी सुरेखा कोळी, कृषी पर्यवेक्षक सतीश गौडर, वैशाली पटगार, नागाप्पा, सेवा प्रतिनिधी गौरम्मा जंगम, सुरेखा तलवार, विजयालक्ष्मी सूर्यवंशी, दीपा, भाग्यश्री सुनगार, वनिता अगसगा, सुद्धा नायक, निश्चिता गुणगा, माधुरी सुतार, शिल्पा नायक, करुणा आदींसह अनेक स्वसहाय संघाच्या कार्यकर्त्या आणि इतर महिला उपस्थित होत्या.

Tags: