कबड्डी खेळणार्या दोन संघांचे खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांमध्ये लाठ्याकाठ्या घेऊन जुंपल्याची घटना रामदुर्ग तालुक्यातील प्रसिद्ध चंदरगी स्पोर्ट्स स्कूलमध्ये घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीमार करत दोन्ही गटांना शांत केले.
होय, बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील प्रसिद्ध चंदरगी स्पोर्ट्स स्कूलमध्ये चंदरगी व कटकोळ शाळेच्या युवा संघांचा अंतिम सामना सुरू असतानाच गोंधळ सुरू झाला. दोन्ही संघांचे खेळाडू आणि त्यांच्या समर्थकांत काही कारणावरून तुंबळ हाणामारी झाली.
अचानक सुरु झालेल्या या हाणामारीत हाताला मिळेल त्या काठ्या घेऊन तरुण एकमेकांवर तुटून पडले. क्षुल्लक कारणावरून चंदरगी व कटकोळ गावातील तरुणांनी एकमेकांवर काठ्या उगारल्या.
चंदरगी क्रीडा शाळेच्या प्रांगणात विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी घडलेल्या या घटनेने उपस्थित चंदरगी ग्रामस्थ थक्क झाले. अनेक विध्यार्थ्यानी विशेषतः विद्यार्थिनींनी घाबरून पळ काढला. दोन गावातील तरुणांमधील हाणामारी पाहून स्थानिक विद्यार्थी उठले आणि धावले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीमार करत दंगेखोर तरुणांना पांगवले.


Recent Comments