बरगुरू रामचंद्रप्पाणावर यांनी भरत नगरी या कादंबरीत गंगा मातेसंदर्भात अश्लील लिखाण करून अवमान केला आहे. सरकारने त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिकोडी गंगा माता कोळी समाज संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
अलीकडेच प्रा. बारगुरू रामचंद्रप्पाणावर यांनी आपल्या भरत नगरी या कादंबरीत गंगा मातेसंदर्भात अवमानकारक आणि अश्लील शब्दांचा वापर केला आहे. गंगा मातेला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून पौराणिक काळापासून एक अनन्यसाधारण असे महत्व आहे. अशा गंगा मातेसाठी इतक्या हीन पातळीवर लिखाण करण्यात आले असून सरकारने त्यांच्या पुस्तकावर बंदी घालावी आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी चिकोडी गंगा माता कोळी समाज संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संघाचे एस ए होळेप्पगोळ म्हणाले, बरगुरू रामचंद्रप्पा यांनी गंगामातेवर अपमानास्पद शब्द वापरून लिखाण केले आहे. यामुळे केवळ गंगामातेचाच नाही तर गंगामातेच्या भक्तांचाही अपमान केला आहे. हि कादंबरी छपाई करण्यासाठी सरकारी निधीचा वापर करण्यात आला असून सरकारनेच या कादंबरीवर बंदी आणावी आणि बरगुरू रामचंद्रप्पा यांना कठोर शिक्षा करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी आर ए गस्ती, किशोर शिरंगे, वीरभद्र दुंडगी, पी आर दासनट्टी, विनायक कोचरी, के एस नायक, आय वाय पीजेर, बसवराज सुनगार आदीं उपस्थित होते.


Recent Comments