बेळगावात 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन आज मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शासकीय सोहळ्यात जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने सोमवारी सकाळी 75 वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाचा जाहीर समारंभ जिल्हा स्टेडियमवर पार पडला. जलसंपदा खात्याचे तथा जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर गोविंद कारजोळ यांनी पंथ संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. पोलीस दलाच्या विविध पथकांच्या आकर्षक पथसंचलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
खासदार मंगला अंगडी, राज्यसभा सदस्या इरण्णा कडाडी, आमदार अनिल बेनके, लक्ष्मी हेब्बाळकर, प्रादेशिक आयुक्त अमलान आदित्य बिस्वास, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिपं सीईओ दर्शन एच व्ही., एसपी डॉ. संजीव पाटील, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, स्मार्टसिटीचे एमडी प्रवीण बागेवाडी, काडा प्रशासक शशिधर कुरेर, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments