कागवाड – जमखंडी राज्य महामार्गावरील उगार-कुडची दरम्यानचा रस्ता विकसित करण्यासाठी राज्य सरकारच्या रस्ते विकास योजनेअंतर्गत १.५० कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते कामकाज करण्यात येत असून या कामकाजाचा शुभारंभ आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते पूजनाने करण्यात आला.
शनिवारी उगार येथे नगरपालिका सदस्य आणि रस्ते विकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदारांनी या कामकाजाचा शुभारंभ केला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते आर पी अवताडे यांनी आमदारांना विकासासंदर्भात माहिती दिली. कंत्राटदार राजू अल्बाळे यांनी विकासकाम उत्कृष्ट दर्जाचे करण्याचा भरवसा दिला.

उगार नगरपालिकेच्या वतीने लाभार्थ्यांना ११.८० लाख रुपयांच्या किटचे वितरण करण्यात आले. मागासवर्गीय लाभार्थी, सोलर किट, दिव्यांगांसाठी वाहन, नगरपालिका कर्मचाऱ्यांना सायकल अशा साहित्याचे वितरण आमदार श्रीमंत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या वर्गखोल्यांचे उदघाटनदेखील आमदारांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास उगार नगरपालिका अधिकारी सुनील बबलादी, सदस्य प्रफुल थोराशे, सुजय फराकट्टे, प्रकाश थोरुषे, हिना शेख, अशोक कांबळे, योगेश कुंभार, बाबू होसमनी, राकेश पाटील, रवी राजमाने, राज्य कर्मचारी संघ कागवाड घटक अध्यक्ष गौडाप्पा सड्डी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments