स्वकुळ साळी समाजाचे आराध्य दैवत श्री जिव्हेश्वर देवाचा जन्मोत्सव बेळगावात आज मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.

वडगाव, खासबाग, शहापूर येथील मंदिरात श्री जिव्हेश्वर देवाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
खासबाग प्रमुख रस्त्यावर पालखी उत्सव काढण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रमांसह सुमारे १ महिन्यांपासून सुरु असलेल्या जिव्हेश्वर जन्मोत्सवाची आज महाप्रसादाने सांगता झाली. समाजाचे अध्यक्ष भालचंद्र चौधरी, गंगाराम दिवटे, श्रीनिवास साखरे, विष्णू ढगे, गोपाळ सप्रे आदींसह स्वकुळ साली समाजाचे मान्यवर, अंकिनी महिला मंडळ आणि जिव्हेश्वर युवक मंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments