Belagavi

महेश फौंडेशनच्या माय ब्लड लॅबोरेटरीचा प्रारंभ

Share

बेळगावचे सुपुत्र महेश जाधव यांनी बेळगाव शहरातील एचआयव्ही बाधित मुलांसाठी शिक्षण व्यवस्था आणि वंचित मुलांसाठी मानवतावादी सेवा देण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. आता माय ब्लड लॅबोरेटरीजची स्थापना करून महेश जाधव यांनी आणखी एका मानवतावादी कार्याचा प्रारंभ केला आहे. त्याचा उद्घाटन सोहळा पार पडला.

होय, कणबर्गी, बेळगाव येथील महेश फौंडेशन, गेल्या 14 वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांसाठी शिक्षण आणि सुविधा आणि शहरातील वंचित मुलांची मानवतावादी सेवा करत आहे. याबाबत महेश फौंडेशनचे महेश जाधव यांचे प्रयत्न अविरत सुरू आहेत. आता महेश जाधव यांनी आणखी एक मानवतावादी कार्य हाती घेतले असून, स्वित्झर्लंडच्या एसएफएस कंपनीने महेश फौंडेशनच्या या धर्मादाय रक्तपेढला आर्थिक मदत केली आहे. मंगळवारी या धर्मादाय रक्तपेढीचा उदघाटन सोहळा कणबर्गी, येथील महेश फौंडेशनच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमाच्या मंचावर एसएफएस कंपनीचे सीएफओ वोल्कर डॉस्टमन, एसएफएस ग्रुपचे भारतीय संघ प्रमुख अल्फ्रेड श्नाइडर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना, सीएफओ वोल्कर डॉस्टमन म्हणाले, “महेश फौंडेशनसोबत सामाजिक कार्यात भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. गेल्या 14 वर्षांपासून एचआयव्ही-बाधित आणि वंचित मुलांची फौंडेशन मानवतावादी सेवा करत आहे. महेश फौंडेशनला माझी ही पहिलीच भेट आहे आणि त्यांचे उपक्रम पाहून मी उत्साहित आहे. या दर्जेदार सुविधा पुरवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो. आणि तुमच्या भावी प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा असे त्यांनी सांगितले. “मी प्रगत देशांमध्ये अशा सुविधा पाहिल्या आहेत, महेश फाऊंडेशनच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी मी मनापासून कौतुक करतो, आम्ही येत्या काही दिवसांत सीएसआरअंतर्गत त्यांच्या उपक्रमांना पाठिंबा देत राहू.” असे आश्वासन ऑटोमोटिव्ह विभागाचे प्रमुख आल्फ्रेड स्नाइडर यांनी उद्घाटनानंतर दिले. यावेळी बोलताना आणखी एका मान्यवरांनी सांगितले की, मी दुसऱ्यांदा या फौंडेशनला भेट देत आहे. मी पण ग्रामीण भागात शिकलो आणि उच्च शिक्षण घेतले आणि आज मी एका मोठ्या कंपनीत काम करत आहे. आमच्या ग्रामीण शाळेत तशी सोय नव्हती. पण महेश फौंडेशन इथल्या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा देत आहे. ही संस्था चांगल्या पदावर जाईल. या फौंडेशनच्या पाठीशी आम्ही सदैव उभे राहू असे त्यांनी सांगितले.  यावेळी महेश फौंडेशनचे संचालक महेश जाधव म्हणाले, आम्ही सर्वांच्या मदतीने हे फौंडेशन चालवत आहोत. आजचा दिवस आनंदाचा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पाहिलेले रक्तपेढी स्थापनेचे स्वप्न साकार होत आहे.आज स्वित्झर्लंडच्या कंपनीच्या आर्थिक मदतीतुन एक स्वप्न साकार झाले आहे. त्यामुळे बेळगावातील जनतेला याचा फायदा होणार आहे. त्यामुळे तरुणांना वर्षातून एकदा तरी रक्तदान करण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत महेश फाऊंडेशनच्या विविध उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी एसएफएस ग्रुप (पूर्वीइंडो-स्कॉटलऑटोपार्ट्सप्रायव्हेटलिमिटेड) गेल्या 8 वर्षांपासून महेश फौंडेशनशी जोडला गेला आहे. त्यांनी वैद्यकीयदृष्ट्या अपंग आणि वंचित मुलांसाठी शाळेच्या बांधकामात महेश फौंडेशनला सहकार्य केले आहे, महेश फाउंडेशनच्या उत्कर्षा लर्निंग सेंटरमध्ये मिनी सायन्स लॅबच्या सेटअपला देखील सहकार्य दिले आहे आणि आता त्यांनी माय ब्लड लॅबोरेटरीजच्या सेटअपमध्ये महेश फौंडेशनला मदत केली आहे. फौंडेशनचे कर्मचारी, मुले आणि इतर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Tags: