आधुनिक जीवनशैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे मत आश्रय फाऊंडेशन, बेळगावच्या संस्थापिका सफल नागरत्ना यांनी व्यक्त केले.

व्हॉइस : सी एस आय इनिशिएटिव्ह राईट्स लिमिटेड, बेळगावचे आश्रय फाउंडेशन यांच्या वतीने माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि भीमनगौडा पोलीस पाटील यांच्या सहकार्याने गोकाक तालुक्यातील अंकलगी येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बिगर सरकारी संस्थांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. 
सी एस आय इनिशिएटिव्ह राईट्स लिमिटेडचे अध्यक्ष लक्ष्मण तपशी बोलताना म्हणाले, दोन्ही संस्थांनी आतापर्यंत सहा मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली आहेत. या शिबिरासाठी आमदार रमेश जारकीहोळी आणि भीमगौडा पोलीस पाटील यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. 
या शिबिरात ३५० हून अधिक लोकांची मोफत नेत्र व दंत तपासणी, हाडे व सांधेदुखी तपासणी, बीपी तपासणी, साखर, रक्तगट, एचबी तपासणी करण्यात आली. याचप्रमाणे मोफत औषधे आणि प्रोटीन पावडरचे वाटप करण्यात आले.
यावेळी आश्रय फाउंडेशनचे स्वयंसेवक, संजीव, नलीन, अनिल, राहुल, ज्ञानेश, कुणाल, विनोद, दीपक, राहुल के, श्वेता आणि आश्रय मधील मुले, डॉ. विनय, डॉ. प्रेमा मठपती, विनोद, संजू, प्रज्वल, पोलीस विभागाचे कर्मचारी आणि श्री ऑर्थो आणि ट्रॉमा सेंटर, सिद्धार्थ नेत्रालय, भरतेश होमिओपॅथिक कॉलेज, कसबेकर मेटगुड क्लिनिक, मराठा मंडळ कॉलेज आदी वैद्यकीय संस्था अंकलगी सरकारी शाळेचे शिक्षक, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments