Belagavi

बेळगावात झळकला 75 मीटर लांब तिरंगा !

Share

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगावात आज एक अनोखी मोहीम राबविण्यात आली. दालमिया भारत फौंडेशन दीक्षा संस्थेच्यावतीने 75 मीटर लांबीचा तिरंगा झळकावण्यात आला.

होय, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेळगावातील कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात अनोखी मोहीम राबविण्यात आली. 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आज, सोमवारी सकाळी 7:50 वाजता कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरापर्यंत 7.5 किमीची पदयात्रा काढून 75 स्वयंसेवकांनी 75 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज फडकवला. यावेळी त्यांनी तिरंगा हातात धरून मानवी साखळी निर्माण केली. सकाळच्या प्रसन्न वातावरणात एक अनोखे, सुंदर दृश्य यावेळी पहावयाला मिळाले.

Tags: