Belagavi

बेळगावात हिंद सोसायटीतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Share

हिंद एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटी, बेळगाव कॅम्पतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

होय, द हिंद एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे बेळगावी कॅम्प येथे आज, रविवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भावसार क्षत्रिय सांस्कृतिक भवन येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत मोफत आरोग्य  तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.

आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन करून बोलताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, कॅम्प परिसर  अतिशय शांत क्षेत्र आहे. या परिसरात अनेक शाळा असल्याने येथील मुले सुशिक्षित होऊन चांगले नागरिक बनतात. याबाबत संपूर्ण राज्यात चर्चा होत असते. या शिबिराचे आयोजन करून चांगला उपक्रम राबविला  आहे. गरीब असो वा श्रीमंत सर्वांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेऊन देवाची सेवा करण्यासारखे आहे. म्हणून देवाने तुम्हा सर्वांचे भले करावे अशी इच्छा व्यक्त केली.

यावेळी डॉ. रवी पाटील, डॉ. श्वेता घटनट्टी, डॉ. विक्रांत घटनट्टी, डॉ. नागभूषण चौगले, डॉ. रुपा गणेशवाडी, डॉ. विकास गणेशवाडी, डॉ. आनंद तोटगी, डॉ. किरणकुमार पुजार, डॉ. झुबिन रुस्तमजी, हिंद एज्युकेशनल अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे सभासद यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Tags: