मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निदान आले आहे. त्यामुळे सध्या ते आरटी नगर येथील निवासस्थानी विलगीकरणात आहेत. यामुळे त्यांनी आपला नियोजित दिल्ली दौराही रद्द केला आहे.
होय, मुख्यमंत्री बोम्मई यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे निदान आले आहे. त्यामुळे ते आरटी नगरातील आपल्या घरीच विलगीकरणात गेले आहेत. आपल्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी आणि आवश्यकता पडल्यास विलगीकरणात रहावे असे आवाहन मुख्यमंत्री बोम्मई यांनी केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला नियोजित दिल्ली दौराही रद्द केला आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह मंत्री अश्वत्थनारायण, हालप्पा आचार, प्रभू चव्हाण, बी. सी. नागेश आदींनी आज दूरध्वनीवरून बोम्मई यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.


Recent Comments