Belagavi

सीमावर्ती भागात कन्नड अनिवार्य करा …

Share

बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागातील सर्व व्यवहारात कन्नड भाषेच्या अंमलबजावणीबाबत
गेल्या 18 जुलै रोजी कन्नड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष टी.एस.नागभरणा यांच्या उपस्थितीत बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी अशी मागणी बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समितीने केली आहे.

 

बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समतेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन सदर मागणी केली आहे.

बेळगाव, निपाणी आणि खानापूर परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स आणि व्यावसायिक दुकानांच्या फलकांवर कन्नड भाषेचा वापर अनिवार्यपणे करावा. उद्याने आणि रस्त्यांना कन्नड मान्यवरांची नावे द्यावीत. प्राधिकरणाने घेतलेल्या बैठकीत सर्व शिक्षण आणि कार्यालयीन कामकाज कन्नड भाषेत असावे, अशी मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर मागण्या १५ दिवसात पूर्ण करून नवे नियम लागू करावेत असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 

यावेळी अशोक चंदरगी, एम जी माकानदार, शंकर बागेवाडी, सागर बोरगल्ल तसेच वीरेंद्र गोबरी आदी उपस्थित होते.

Tags: