Vijayapura

विजापूर : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी

Share

विजापुरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांचे रूपांतर तलावात झाले आहे. नागठाण मतदान क्षेत्रात येणाऱ्या स्टेशन समोरील रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसातदेखील नागठाण मतदार संघाचे आमदार देवानंद चव्हाण यांनी या रस्त्याची पाहणी करून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

विजापूर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागठाण रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून या परिसराची पाहणी आमदार देवानंद चव्हाण यांनी केली.यावेळी आमदार देवानंद चव्हाण यांनी मतदार संघात झालेल्या नुकसानीसंदर्भात तात्काळ सर्व्हे करून भरपाई देण्यात यावी, जनतेची गरसोय न करता तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीसंदर्भात अहवाल सादर करून भरपाई देण्यासंदर्भात देखील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सरकार आपल्या मतदारसंघासाठी अनुदान देण्यात भेदभाव करत असल्याचा आरोपही केला.

यावेळी मनपा आयुक्त विजयकुमार मेक्कळकि बोलताना म्हणाले, या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण करण्यात येणार आहे. अनेकांनी तक्रारी केल्याने या तक्रारी प्रलंबित असल्याने कामकाज स्थगित झाले आहे. मागील वर्षी या रस्त्याच्या रुंदीकरणाला मंजुरी मिळाली आहे. केआरआयडीएल यांनी हा र्टस बनविणे गरजेचे होते परंतु रास्ता बनविण्यात आला नाही. यासंदर्भात पालिकेकडून त्वरित रस्त्याचे काम सुरु करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी केआरआयडीएल चे कार्यकारी संचालक अभियंते तिम्मराजप्पा, सहायक कार्यसंचालक अभियंते मल्लिकार्जुन मट्टीकट्टी, पालिका अधिकारी, नेते फयाज, गुलाब चव्हाण, शिवानंद हिरेकुरबुर, शशिकुमार उकुमनाळ, रवी चव्हाण आरिफ आदींसह इतर उपस्थित होते.

नागठाण मतदार संघाच्या विकासासाठी अनुदान देण्यात सरकार भेदभाव करत असल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारने अनुदान जाहीर करावे, जेणेकरून येथील जनतेची गरसोय होणार नाही, अशी मागणी येथील जनता करत आहे.

Tags: