उत्तर कर्नाटकातील लिंगायत समुदायातील मुख्यमंत्री बनले. त्यामुळे लिंगायत समाजावर भाजपने कोणताही अन्याय केला नाही, असे मत के एल इ संस्थेचे कार्याध्यक्ष, माजी राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. डॉ. प्रभाकर कोरे यांनी काळ वयाची ७५ वर्षे पूर्ण केली असून या पार्श्वभूमीवर सिद्धरामोत्सवप्रमाणे आपल्या चाहत्यांनाही कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी यावेळी विचारला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, ज्याठिकाणी माझे चाहते मला बोलावतील त्याठिकाणी मी जाईन अद्याप मला यासंदर्भात काही माहिती नसल्याचे ते म्हणाले.
प्रभाकर कोरे लवकरात लवकर राज्यपाल होतील का? या मीडियाच्या प्रश्नाबाबत प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, याबाबत अद्याप मला माहिती नाही. मात्र पक्षाने जबाबदारी दिली तर ती आपण नक्की पार पाडू, असे सांगत आपण नेहमीच राज्याच्या राजकारणात सक्रिय होतो आणि यापुढील काळातही आपण सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाज भाजपकडून दुर्लक्षिला जात असल्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, भाजपने उत्तर कर्नाटकातील लिंगायत समुदायातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. यामुळे भाजपकडून लिंगायत समाजावर कोणता अन्याय केला असल्याचे मला वाटत नाही, असे डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले.
डॉ. प्रभाकर कोरे यांचा जन्मदिन, के एल इ संस्थेचा दीक्षांत समारंभ यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान डॉ. कोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्यपालपदासंदर्भात देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली असून पक्षाने जर आपल्याला जबाबदारी सोपविली तर नक्कीच आपण ती पार पाडू, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments