बेळगावमधील जाधव नगर येथील केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या कार्यालयात सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्यावतीने बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील विविध समाजांना साउंड सिस्टम तसेच खुर्च्यांचे वाटप करण्यात आले.

बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदार संघातील विविध समाजांना साउंड सिस्टम तसेच खुर्च्यांचे वाटप युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना युवानेते राहुल जारकीहोळी बोलताना म्हणाले, बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्यावतीने घटप्रभा सेवादलातील विद्यार्थ्यांना लष्कर, पोलीस प्रशिक्षण मोफत देण्यात येत आहे. आज समाजाचा विचार करणारा नेता आपल्याला हवा आहे. शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणे, मुलांमध्ये नवचैतन्य निर्माण करणे या उद्देशाने नेते निवडून आले तर जिल्ह्यात आणि राज्यात परिवर्तन शक्य आहे. आज लाखो विद्यार्थी उत्तम शिक्षण असूनही नोकरीच्या शोधात आहेत. अशा लोकांना मार्ग दाखविण्याचे काम समाजात व्हायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आज विविध समाजांसाठी साउंड सिस्टम आणि खुर्च्या वितरित करण्यात आल्या असून हा उपक्रम समाजसेवेसाठी हाती घेण्यात आला असून राजकीय लाभासाठी राबविण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागातील बस स्थानकावर अस्वच्छता वाढली आहे. हि बाब लक्षात घेऊन सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता मोहीम देखील राबविण्यात आली. तसेच स्वचतेसंदर्भात जनजागृतीही केली. याचप्रमाणे मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या शाळांना सुधारण्याच्या दृष्टिकोनातून रंगरंगोटी, शाळेत शौचालयांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करण्यात येत असून समुदाय भवनात आवश्यक सुविधा, पुरविल्यास गरिबांना याचा फायदा होऊ शकेल, या दृष्टिकोनातून सतीश जारकीहोळी फाउंडेशन कार्यरत असल्याचे राहुल राजकीहोळी म्हणाले.यावेळी मालगौडा पाटील, प्रदीप एमजे, परशुराम धागे, निवृत्त एस पी अशोक सदलगे, किरण पाटील, सलीम सनदी, संजय देसाई, सिद्दीक अंकलगी, रियाझ किल्लेदार आदी उपस्थित होते.


Recent Comments