Belagavi

बेळगावमध्ये आधार क्रमांक मतदार ओळख पत्राशी जोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

Share

आधार क्रमांक मतदार ओळख पत्राशी जोडण्याच्या प्रक्रियेला बेळगावमध्ये आजपासून सुरुवात झाली आहे.

सोमवारी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सदर कार्याची सुरुवात झाली. वृक्षाला पाणी घालून या मोहिमेची सुरुवात डीसीपी रवींद्र गडादि आणि अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते करण्यात आली.

यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडादि म्हणाले, मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याची प्रक्रिया आजपासून बेळगावमध्ये सुरु झाली आहे. सरकारने जारी केलेल्या योजनांची योग्यप्रकारे अंमलबजावणी करणे हि आमची जबाबदारी आहे. यासंदर्भातील आवश्यक ती सर्व माहिती १८ वर्षांच्या मुलांपर्यंत पोहोचविण्याचे काम करून प्रत्येक घरोघरी जाऊन सर्व माहिती घेऊन आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडण्याचे काम करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले. ()

अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी बोलताना म्हणाले, भारतीय निवडणूक आयोगाने आणलेल्या दुरुस्तीबाबत बीएलओ, महाविद्यालयाचे प्राचार्य, बीएलओ सुपरवायझर आदींनी जागृती करावी, प्रचार करावा. आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडण्याची प्रक्रिया ३१ मार्च २०२३ पर्यंत १०० टक्के पूर्ण करावी. दुहेरी मतदान रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने याची अंमलबजावणी केली असल्याचे ते म्हणाले. ()यावेळी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी बोलताना म्हणाले, पारदर्शक मतदार यादी तयार करण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आधार क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडल्याने बनावट मतदान रोखता येईल, पारदर्शी निवडणुका पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ()

या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नांदगावी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: