बेळगाव महानगरपालिकेच्या व्याप्तीतील विविध कामकाजांसाठी मोठे पॅकेज घोषित करून कंत्राटदारांच्या पोटावर हात मारण्याचे काम अधिकाऱ्यांकडून केले जात असून कामकाजांसाठी छोटे पॅकेज जाहीर करण्यात यावेत, या मागणीसाठी कंत्राटदारांनी आंदोलन छेडले.
छोटे पॅकेज जाहीर करणे बंद करण्याच्या मनपाच्या निर्णयावर कंत्राटदारांनी निषेध केला असून याविरोधात आज बेळगाव मनपासमोर कंत्राटदारांनी आंदोलन छेडले. मागील वेळी महात्मा गांधी नगर योजने अंतर्गत १०० कोटींचे अनुदान देण्यात आले होते. यामाध्यमातून ५ कोटी रुपयांपर्यंतची मोठी पॅकेज देण्यात आली आहेत. २५, ३०, ५० लाख रुपयांचे एस्टिमेशन असलेल्या २५ कामकाजाचे एकत्रीकरण करून ५ कोटींचे पॅकेज तयार करण्यात आले. याबाबत आंदोलन छेदून मुख्यमंत्र्यांना निवेदन देखील देण्यात आले. मात्र याला कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. हा सरकारी आदेश असून यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात येत नाही. पुढील कामकाजादरम्यान या मागणीचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र आश्वासन पाळण्यात आले नाही, असा आरोप कंत्राटदारांनी करत धरणे आंदोलन छेडले.
यावेळी मनपा कंत्राटदार संघाचे अध्यक्ष राजू पद्मन्नावर बोलताना म्हणाले, बेळगावमध्ये २०० स्थानिक कंत्राटदार आहेत. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर कोणतेही कामकाज आपल्याकडे आले नाही याचा कोणतेही अधिकारी विचार करत नाहीत. १५ ते २५ लाखांचे एस्टीमेट असलेल्या कामकाजाची ३ – ४ कोटी रुपयांची टेंडर मागविण्यात आल्याचे पद्मन्नावर म्हणाले.
यासंदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती करण्यात आली आहे. यावेळी सदर पॅकेज लहान करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. मात्र पुन्हा मोठे पॅकेज बनविण्यात आल्याने आपण धरणे आंदोलन छेदत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.


Recent Comments