सर्व दानांमध्ये सर्वात मोठे दान म्हणजे रक्तदान होय. बेळगावात रक्तदान शिबिराचे आयोजन करून आरंभ ढोलपथक मंडळाने सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे.
आरंभ ढोलपथकाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी बेळगावातील शहापूरातील मराठा सांस्कृतिक भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून ढोलपथक मंडळ गणेशोत्सव, शिवजयंती आणि इतर उत्सवांमध्ये आपली कला सादर करत आहे. यासोबतच ते अनेक सामाजिक कार्य करत आहेत. आज झालेल्या रक्तदान शिबिरात दीडशेहून अधिक लोकांनी केएलई ब्लड बँकेला रक्तदान केले.

यावेळी नगरसेवक नितीन जाधव यांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करून सांगितले की, आरंभ ढोलपथक अल्पावधीत चांगले काम करत आहे. सर्व संस्थांनी अशाप्रकारे लोकांच्या हिताचे सामाजिक कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कोरे गल्लीतील ज्येष्ठ नागरिक ज्योतिबा पाटील, सोमनाथ पाटील, आरंभ ढोलपथकाचे राजेश सावंत, गोविंद कुलकर्णी, विठ्ठल शिंदे, डॉ. हर्षिता, कल्लाप्पा हंडे, शिवाजी मजूकर, सुधीर नेसरीकर, परशुराम मजूकर, गजानन जाधव आदी उपस्थित होते.


Recent Comments