बेळगावात श्रावण मासानिमित्त नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर चालणाऱ्या जनजागृती पदयात्रेला आजपासून सुरुवात झाली.
जागतिक लिंगायत महासभा व राष्ट्रीय बसव सेना जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावण मासानिमित्त महिनाभर जनजागृती पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अल्लमप्रभू महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेला शुक्रवारी सह्याद्री नगर येथील लक्ष्मी मंदिरापासून सुरुवात झाली. यावेळी स्वामीजींनी भाविकांना रुद्राक्ष दीक्षा दिली.
यावेळी बोलताना डॉ. अल्लमप्रभु स्वामीजी म्हणाले, श्रावण मासामुळे आपल्या सर्वांच्या मनात आणि शरीरात आनंद आणि उत्साह आणला आहे. वर्षातील १२ महिन्यांपैकी सर्वात मोठा महिना म्हणजे श्रावण. श्रावण महिन्यात कोणी दुष्कर्म करत नाही. कारण श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना. आजची जनजागृती पदयात्रा ही चांगली सुरुवात असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात कारंजी मठाचे शिवयोगी देवरु, ओम गुरुजी, लिंगायत नेते बसवराज रोट्टी, शंकर गुडस, डॉ. रवी पाटील, ईनन्यूज वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजशेखर पाटील व इतर मान्यवर, जागतिक लिंगायत महासभा व राष्ट्रीय बसवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments