Belagavi

कल्लेहोळ गावातील वृद्ध बेपत्ता

Share

बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावातील वृद्ध गणपत सिद्धप्पा कांबळे बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.

 

होय, कल्लेहोळ गावातील जनता कॉलनीत राहणारे 65 वर्षीय गणपत सिद्धप्पा कांबळे 21 जुलैपासून बेपत्ता आहे. ते फिरायला जाऊन येतो म्हणून बायकोला सांगून बाहेर पडले होते. ते घरी परतलेच नाहीत.

 

याप्रकरणी काकती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास तत्काळ काकती पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: