Belagavi

रुचिका पाटील हिला सीबीएससी दहावी परीक्षेत  ९९.४० टक्के  गुण

Share

बेळगाव तालुक्यातील सुळगा (हिंडलगा) येथील रुचिका अमोल पाटील हिने दहावी सीबीएससी परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्रीय विद्यालय क्र. येथे ती शिकत होती. चार विषयांत तिने पैकीच्या पैकी गुण मिळवले. रुचिकाने बेळगाव केंद्रीय विद्यालयाचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. तिचे वडिल सैन्यात सेवा बजावत आहेत. रुचिका ही नारायण पाटील व इंदू पाटील यांची नात आहे.  रुचिकादेखील आपल्या वडीलांच्या प्रमाणे  संरक्षण दलात काम करण्याचा मानस माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे . तिला वडील अमोल पाटील, आई पूनम पाटील आणि केंद्रीय विद्यालयच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Tags: