Gokak

दुचाकी आणि सोन्याचांदीचे दागिने पोबारा करणाऱ्या त्रिकुटाला अटक

Share

दुचाकी आणि सोन्याचांदीचे दागिने चोरणाऱ्या भामट्यांना पकडण्यात गोकाक शहर पोलिसांना यश आले आहे .

गोकाकच्या योगीकोळ्ळ रस्त्यावर दुचाकीवरून संशयास्पद रित्या आढळलेल्या ३ आरोपीना गोकाक पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्याने ही बाब समोर आली आहे . याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात बाजारातील गुल्लर यांच्या दुकानात एका महिलेचा आणि जून महिन्यात विद्यानगर बसव मंडपात एका महिलेचे मंगळसूत्र लांबविण्यात आले होते .

अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे ५० ग्रॅम सोन्याचे दागिने, ८० हजार रुपये किमतीची २ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सदर प्रकरणाची नोंद गोकाक पोलीस स्थानकात झाली आहे .

Tags: