जे एम एफ सी न्यायलयात कर्नाटक जन्म, मृत्यू नोंदणी दुरुस्ती नियमात बदल करण्यात आले असून सदर नियम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत बैलहोंगल तालुका वकील संघाच्यावतीने आंदोलन छेडत तहसीलदार बसवराज नागराळ यांना निवेदन देण्यात आले आहे.
व्हॉइस : बैलहोंगल न्यायालय परिसरात तहसीलदार कार्यालयावर तालुक्यातील वकिलांनी जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्तीसंदर्भातील नियम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करत आंदोलन छेडले.
यासंदर्भात वकील संघाचे उपाध्यक्ष एम आर सोमाण्णावर, सचिव संतोष भावी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, जन्म आणि मृत्यू नोंदणी कायद्यात काही बदल करण्यात आले आहेत. जे एम एफ सी न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या खटल्यांचे वर्गीकरण उपविभागीय अधिकाऱ्यांच्या न्यायालयात करण्यासंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. यामुळे पक्षकारांवर अन्याय होईल. कर्नाटक जन्म, मृत्यू नोंदणी नियम रद्द करण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी वकील एम एम अल्लय्यानावर, सी एस चिक्कनगौडार, एम एम सोपान, डी वाय गरगद, एस जी चिक्कमठ, बसवराज दोत्रद, एस बी बडिगेर, एफ एफ कुरुबर, अश्विनी पिरगोजी, बी एन लक्कनगौडर, महम्मदशपी अंकलगी, सी एच माळगी, पूजा डुम्माळे, गिरीजा अलदकट्टे, पूर्णिमा चौबारी, बी आर हरिदास, विजयालक्ष्मी हिरेमठ तसेच इतर वकील सहभागी झाले होते.


Recent Comments