Belagavi

माझी लेव्हल कमी असेल; डीकेशिनीच मोठे व्हावे : जमीर अहमद खान

Share

सिद्धरामय्याच पुढचे मुख्यमंत्री व्हावेत असे वक्तव्य करणाऱ्या माजी मंत्री जमीर अहमद खान यांना माझ्या स्तरावरील लोकांनी याबाबत बोलावे असे आव्हान केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिले आहे. त्यावर डी. के. शिवकुमार यांची लेव्हल मोठी असेल, माझी कमी असू शकते, त्यांनी आणखी मोठे व्हावे, अशा शब्दांत जमीर अहमद खान यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

आगामी निवडणुकांबाबत काँग्रेस अल्पसंख्याक नेत्यांची सभा आज बेळगाव येथील ताज गार्डन येथे आयोजित केली होती. जमीर अहमद यांच्या वक्तव्यावर केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी, “सगळ्या नेत्यांनी आधी काँग्रेस पक्ष मजबूत करावा आणि मग मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे, प्रत्येकाने तोंड बंद ठेवून काम करावे’ अशी प्रतिक्रिया दिली होती. यासंदर्भात बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना आमदार जमीर अहमद म्हणाले, डी.के. शिवकुमार यांनी वैयक्तिकरित्या माझे नाव घेतले नाही.

सर्वांनी एकत्र येऊन पक्षाला मजबूत करावे असे म्हटले आहे.  बाईट  मुख्यमंत्री कोण व्हावे हे काँग्रेस पक्षाच्या हायकमांडवर अवलंबून आहे. सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्री व्हावेत असे माझे वैयक्तिक म्हणणे आहे. राज्याच्या दौऱ्यादरम्यान, जनतेनेही सिद्धरामय्याच मुख्यमंत्री व्हावेत असे मत व्यक्त केले आहे. सिद्धरामय्या सरकारच्या योजना अजूनही लोकांच्या समरणात आहेत असे जमीर अहमद  म्हणाले. बाईट पक्षाचे नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी कोण मुख्यमंत्री होणार हे ठरवतील. डी.के. शिवकुमार यांनीच वक्कलिगा समाजाचा मुख्यमंत्री व्हावा असा विचार मांडला आहे.

मुस्लिमांनाही मुस्लिम मुख्यमंत्री व्हावा असे वाटत असेल. त्यानुसार मी माझे वैयक्तिक मत व्यक्त करून सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे म्हटले आहे असे जमीर अहमद यांनी सांगितले. बाईट  या शाब्दिक युद्धादरम्यानच डी.के. शिवकुमार यांची भेट घेतल्याबाबतच्या प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना, डी. के. शिवकुमार आमच्या काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांची भेट घ्यायची नाही तर भाजपचे अध्यक्ष नलिनकुमार कटील यांना भेटायचे का, असा प्रतिसवाल जमीर अहमद यांनी केला.

सिद्धरामय्या यांच्या अमृत महोत्सवाविषयी बोलताना जमीर अहमद यांनी, सगळ्या चाहत्यांकडून हा उत्सव आयोजित केलाय. दावणगेरे येथे 3 ऑगस्ट रोजी हा महोत्सव होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाईट या वेळी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे स्थानिक नेते उपस्थित होते.

Tags: