Vijayapura

विजापुरमध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय

Share

विजापुर मध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. वेड्यांच्या वेशात येऊन कमी दरात विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे आकर्षित होणाऱ्या लहान मुलांना पळविण्याचा प्रकार पुढे आला आहे.

विजापुर मध्ये विविध प्रकारे नवनव्या शक्कल लढवून लहान मुलांना पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. असाच एक प्रकार विजापुर मध्ये निदर्शनास येताच नागरिकांनी चोराला पकडून खांबाला बांधून धुलाई केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

विजापूर येथील बुरानपुर परिसरात बसव नगर येथे लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाली आहे. या संदर्भातील एक प्रकरण नुकतेच निदर्शनास आले असून या साऱ्या प्रकारामुळे विजापूर मधील नागरिक चिंताग्रस्त आहेत. बसव नगर येथील रहिवासी रेणुका यांच्या चार वर्षीय मुलाला पळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. घरासमोर खेळणाऱ्या मुलाला चोरांनी पळविण्याचा प्रयत्न करताच सदर मुलाने जोराने रडण्यास सुरुवात केली. यामुळे घराबाहेर येऊन मुलाच्या आईने सदर प्रकार पाहिला. चोराचा पाठलाग करत रेणुका यांनी आपल्या मुलाला चोरा कडून हिसकावून घेतले, असे येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले

या साऱ्या प्रकारानंतर सदर चोराला नागरिकांनी खांबाला बांधून धुलाई केली आहे. विजापुर मध्ये वारंवार हे प्रकार घडत असून या सार्‍या प्रकारामुळे येथील नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत. अनेक नागरिक कामानिमित्त बाहेर जात असल्याने त्यांना मुलांची चिंता लागली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गांभीर्याने लक्ष पुरविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Tags: