Belagavi

शंकरगौडा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

Share

कर्नाटक सरकारचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी, ज्येष्ठ भाजप नेते शंकरगौडा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. समाजाच्या भल्यासाठी नेहमीच काम करणाऱ्या शंकरगौडा पाटील यांच्यावर आज त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

बेळगाव भाजपचे ज्येष्ठ नेते, कर्नाटक सरकारचे दिल्लीतील माजी विशेष प्रतिनिधी, बुडाचे माजी अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांचे माजी सल्लागार, शंकरगौडा प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्ये करीत असलेले शंकरगौडा पाटील यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त आज त्यांनी बेळगावातील राणी चन्नम्मा चौकातील  श्री गणेश मंदिरात विशेष पूजा केली. यानंतर त्यांनी वैभवनगर येथील नंदन मक्कळ धाम येथे जाऊन केक कापून वाढदिवस साजरा केला. गोरगरिबांचे बंधू, सामाजिक कार्यकर्ते शंकर गौडा पाटील यांचा वाढदिवस एड्सग्रस्त अनाथांना मदत वाटप आणि गरिबांना अन्नदान करून त्यांच्या चाहत्यांनी अर्थपूर्णरीत्या साजरा केला. यावेळी बोलताना जिल्हा बांधकाम व अन्य कामगार संघाचे अध्यक्ष एन. आर. लातूर म्हणाले, देव त्यांना आरोग्य आणि समृद्धी देवो. त्यांच्या प्रयत्नातून दरवर्षी 17 हजार गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. कामगारांसाठी 2021 मध्ये 22 कोटी अनुदान आले आहे. कामगारांच्या कल्याणासाठी 2008 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेचे ही त्यामागे  प्रयत्न आहे. शंकरगौडा पाटील यांनी स्थापन केलेल्या योग केंद्रामुळे लोकांना चांगले आरोग्य प्राप्त करणे शक्य झाले असल्याचे ऍड. लातूर यांनी सांगितले. भाजप ओबीसी मोर्चाचे नेते किरण जाधव म्हणाले, दिग्गज नेते शंकरगौडा पाटील यांचा आज वाढदिवस. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो असे सांगून त्यांनी शंकरगौडा पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भाजप आणि सकल मराठा समाजच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

नगरसेवक राजशेखर डोणी यावेळी म्हणाले, भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विशेष पूजा करण्यात आली. त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येत आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर शंकरगौडा पाटील यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले. तसेच राष्ट्रपतीपदी निवड झालेल्या द्रौपदी मुर्मू यांचे अभिनंदन केले. आता देशातील तरुण जागा झाला आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहे. आगामी काळात नवे चेहरे समोर आणून देशाच्या उन्नतीसाठी मेहनत करू. नवीन चेहऱ्यांना नगरसेवक, आमदार करून समाजसेवेसाठी मदत करणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

यानंतर शंकरगौडा पाटील यांनी भाग्यनगर येथील शाळेत जाऊन विध्यार्थ्यांना मदत वाटप केली. त्यानंतर शांताई वृद्धाश्रमात जाऊन त्यांनी तेथील वडिलधाऱ्यांसोबत वेळ घालवला. यावेळी मदनकुमार भैरप्पनावर, गजानन मिसाळे, गुंडू मास्तमर्डी, राजशेखर ढोणी, सुजीत मुळगुंद, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.

Tags: