Belagavi

मुले चोरणाऱ्या तरुणाची धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात

Share

मुले चोरणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. विजापूर शहरातील गांधीनगरमध्ये ही घटना घडली.

मुले चोरणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी खांबाला बांधून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. विजयपूरच्या गांधीनगरमध्ये ही घटना घडली. शिवनगी गावचा रहिवासी इक्बाल हसनसाब बगली असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर बालचोरीचा आरोप असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो सध्या पोलीस कोठडीत असून तो मानसिक आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. रेणुका नामक महिलेच्या चार वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करताना नागरिकांनी त्याला पकडले. ही घटना विजापूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: