बेळगावातील दत्त, गल्ली वडगाव येथील भंडारी यांच्या गच्चीवर उडी घेताना डोकीला मार लागून मृत्युमुखी पडलेल्या वानरावर समाजसेवक आणि मनपा कर्मचाऱ्यांनी विधिवत अंत्यसंस्कार केले.
दत्त गल्ली, वडगाव येथील भंडारी यांच्या गच्चीवर उडी घेताना डोकीला मार लागून वानर मरण पावल्याची घटना आजुबाजुच्या लोकांच्या निदर्शनास आली. त्यांनी महापालिका वार्ड निरीक्षकांना याची माहिती दिली. लगेच शिल्पा कुंभार यानी आपल्या सहकारी कामगाराना याबाबत सूचना दिली. महानगर पालिका वार्ड नं 28 चे निरीक्षक संजय पाटील यांनी जोरात पाऊस पडत असताना आपल्या सहकारी कामगाराना घेऊन घटनास्थळी आले. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर तेथे चढ़ता येत नाही तेथे शिडी व दोरी लावून त्या वानराचा मृतदेह खाली काढण्यात आला. त्यानंतर वानरांच्या मृतदेहावर हिंदू रितीरिवाजानुसार समाजसेवक संजय पाटील व सहकाऱ्यांनी वडगाव येथे अंत्यसंस्कार केले. 
या संदर्भात बोलताना समाजसेवक संजय पाटील यांनी शहरांमध्ये घरांच्या छतांवर काही खायला मिळेल म्हणून वानरे उड्या मारत फिरत असतात. त्यांचा वीज तारांमुळे मृत्यू होऊ शकतो. कधी उंचावरून पडून जखमी होतात किंवा मरण पावतात. त्यामुळे प्रशासनाने अशा मूक जनावरांची योग्य काळजी घ्यावी किंवा त्यांना प्राणी संग्रहालयात ठेवावे असे आवाहन केले. 
संजय पाटील यांच्यासह राजू शिगोली, मल्लेश संकन्नवर, कदम, रमेश देसूरकर यांनी या मृत वानरावर अंत्यसंस्कार केले.


Recent Comments