Belagavi

सतीश जारकीहोळी फाउंडेशनकडून नुकसानग्रस्तांना मदत केदनूर, मन्नीकेरी भागातील नुकसानग्रस्तांना मदतीचा हात

Share

अतिवृष्टीमुळे अडचणीत आलेल्या यमकनमर्डी मतदार संघातील केदनूर आणि मन्नीकेरी या गावातील नुकसानग्रस्तांना सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे.

बेळगाव शहर आणि तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बेळगाव तालुक्यातील यमकनमर्डी मतदार संघातील केदनूर आणि मन्नीकेरी या गावातील प्रकाश रामचंद्र, शांत यल्लाप्पा वर्गे, रेखा बाळू राजाई, मल्लव्वा मल्लप्पा पाटील, प्रभू देवनु राजाई आणि कल्पना शट्टू पाटील यांच्या घरीही मुसळधार पावसामुळे पडझड झाली आहे.

हि बाब आमदार सतीश जारकीहोळी यांच्या लक्षात येताच त्यांनी सदर नुकसानग्रस्तांना भेट देण्याची सूचना केली. त्यांच्या सूचनेनुसार केपीसीसी सदस्य मालगौड पाटील यांनी सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने नुकसानग्रस्तांना अन्नधान्याचे वितरण केले. यावेळी सतीश जारकीहोळी फाऊंडेशनच्या वतीने गावातील गटारींची स्वच्छता करण्यात आली.

Tags: