Belagavi

कंग्राळी बुद्रुक ग्रापं अध्यक्षपदी पूनम पाटील; उपाध्यक्षपदी यल्लोजीराव पाटील अविरोध 

Share

बेळगाव तालुक्यातील कंग्राळी  बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम विकास आघाडीचा विजय झाला आहे. ग्राम पंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षपदी पुनम जयराम पाटील आणि उपाध्यक्षपदी यल्लोजीराव पाटील यांची आज शुक्रवारी बिनविरोध निवड केली.

गेल्या कित्येक दिवसांपासून रखडलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा ग्रामविकास आघाडीचा आज विजयी झाला आहे. या आधी कंग्राळी बुद्रुक येथील  ग्रामपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपला मनमानी कारभार करत असल्याने  ग्रामपंचायत सदस्यांनी दबाव आणून त्यांचा राजीनामा घेतला होता.  त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद रिक्त होते. गेल्या कित्येक दिवसांपासून  गावचा विकास रखडला असल्याने  अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणे गरजेचे होते.

त्यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन आज बिनविरोधपणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली. त्यामुळे पूनम जयराम पाटील आणि यलोजीराव पाटील जनतेच्या सेवेत रुजू झाले आहेत.

Tags: