बेळगावमधील अंध असोसिएशनच्या माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या प्रांगणात केंद्रीय जीएसटी प्रोजेक्टमधील स्वच्छता निधीतून निर्माण करण्यात आलेल्या क्रिकेट मैदान-ट्रॅक, पिण्याचे पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या विविध कामकाजाचे लोकार्पण करण्यात आले.

क्रिकेट मैदान-ट्रॅक, पिण्याचे पाणी, रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या अनेक सुविधा माहेश्वरी अंध शाळेला अर्पण करण्यात आल्या. बेळगावमधील अंध असोसिएशनच्या माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या प्रांगणात केंद्रीय जीएसटी प्रोजेक्टमधील स्वच्छता निधीतून सदर कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. या कार्यक्रमास केंद्र जीएसटी प्राचार्य चीफ रंजना झा, बेळगावचे केंद्रीय जीएसटी आयुक्त बसवराज नलेगवे, माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या प्राचार्य अनिता एम गावडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला उद्देशून बोलताना रंजना झा म्हणाल्या, शाळेच्या प्रांगणात करण्यात आलेली विकासकामे हि लहान नाहीत. यासाठी सातत्याने प्रक्रिया सुरू आहे. माहेश्वरी अंध शाळेतील मुले हि दृष्टिहीन आहेत. कित्तूर चन्नम्मा यांच्या प्रेरणेतून, स्फूर्तीतून आपण प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून पुढे जावे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी बेळगावचे केंद्रीय जीएसटी आयुक्त बसवराज नलेगवे बोलताना म्हणाले, केंद्र जीएसटी स्वच्छता निधीतून करण्यात आलेले हे कामकाज अत्यंत छोटे आहे. आपल्याला अजूनही अनेक विकासकामे करायची आहेत. माहेश्वरी अंध शाळेतील दृष्टिहीन मुलांसाठी काम करण्याची संधी मिळणे हि आपल्यासाठी मोठी बाब आहे, भविष्यात अजून काही कामे करायची असल्यास आपण सदैव तत्पर असल्याचे ते म्हणाले.
यावेळी सहआयुक्त श्रीमती जय भरती, राजेश रामराव, अतिरिक्त आयुक्त पी शांतीसुद्धा, एम मुरुघराम, सह आयुक्त महेश पाटील, अधीक्षक शिवनगौडा पाटील, पी आर बिदरी, सुमित कलगटगी, बीडीएबी अध्यक्ष चंद्रशेखर बेंबळगी, सुमिता मितगार, शिल्पा कुसलापूर, शालेय शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments