Belagavi

उद्यमबागमधील रस्ते, गटारींसाठी 60 कोटी अनुदान : आ. अभय पाटील

Share

बेळगावातील उद्यमबाग परिसरातील रस्ते आणि ड्रेनेज गटारींच्या कामांसाठी मी सुमारे 60 कोटी रुपये निधी मंजूर करवून घेतला आहे. 5 कोटी रुपये खर्चून रस्त्याचे काम यापूर्वीच सुरु केले असून, उर्वरित सर्व कामे येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण होतील असे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.

या संदर्भात व्हिडिओ निवेदन प्रसिद्धीस देऊन आ. अभय पाटील यांनी म्हटले आहे की, बेळगावातील उद्यमबाग परिसरात रस्ते आणि भुयारी गटारिंच्या बांधकामासाठी 60 कोटी रुपयांची योजना आखली असून, 60 कोटी रुपये निधी सरकारकडून मंजूर करून घेतला आहे.

यामध्ये फाउंड्री क्लस्टरजवळ पाच कोटी रुपये खर्चून सिमेंट रस्ता यापूर्वीच करण्यात आला आहे. इतर भागातही रस्ते व ड्रेनेजची कामे पुढील आठवड्यात सुरू होणार आहेत. ती येत्या 26 जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. बाईट

Tags: