आषाढी एकादशीनिमित्त खडेबाजार बेळगाव येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विशेष पूजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाविकांनी सकाळपासूनच भक्तिभावाने देवाचे दर्शन घेतले.

बेळगाव खडेबाजार येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाजारात पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नारळ, केळी, अन्य फळे, फुले, तुळशीच्या माळा, कपूर, उदबत्ती इत्यादींची खरेदीविक्री व्यापार जोरात सुरू होती. भाविक फळे, फुले खरेदी करून देवाच्या दर्शनासाठी पहाटेच दाखल होत होते. दरम्यान, इन न्यूज आपली मराठीशी बोलताना भटजी दत्तात्रेय वसंतराव जोशी म्हणाले, आज आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची विशेष पूजा केली आहे. ईश्वर सर्व भक्तांना चांगली बुद्धी, दीर्घायुष्य आणि आरोग्य देवो आणि त्यांचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त आज दिवसभर मंदिरात अनेक भाविकांनी विठ्ठल-रखुमाईचे दर्शन घेतले.


Recent Comments