बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील शिवाजीनगर येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर सरकारी प्राथमिक शाळा यळेबैल आयोजित सरकारी शिक्षण खात्याच्या बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडास्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.

स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगुंदी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा हेमा सुभाष हदगल, बीजगर्णी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष मनोहर पिराजी बेळगांवकर, यळेबैल प्राथमिक शाळा सुधारणा समिती अध्यक्ष अप्पाजी पाटील, बेळगुंदी क्लस्टरच्या सीआरपी एस,पी रेडेकर, केंद्र मुख्याध्यापिका एस पी गोळे, शिक्षक संघाचे प्रतिनिधी मारुती नागण्णावर, मुरलीधर कुन्नूरकर उपस्थित होते. प्रारंभी सरकारी मराठी पूर्व प्राथमिक शाळा बेळगुंदीच्या मुलींनी स्वागतगीत व ईशस्तवन गायिले शाळेचे मुख्याध्यापक एम,पी कनगुटकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर महेश पाटील यांच्या हस्ते क्रीडाध्वजारोहण, मनोहर बेळगांवकर, बाळकृष्ण लोहार, रितेश जाधव यांच्या हस्ते क्रीडाज्योतीचे अनावरण करण्यात आले. एस पी माने यांनी सहभागी खेळाडूंना शपथ देवविली. यानंतर पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनपर भाषणे केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याधर यादव यांनी केले तर अविनाश कांबळे यांनी आभार मानले.


Recent Comments