Belagavi

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार प्रदान

Share

व्यापार आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांना आणि उद्योगांना बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

होय बेळगावातील उद्यमबाग येथील फौंड्री क्लस्टरच्या सभागृहात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचा 2021-22चा पुरस्कार वितरण कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पार पडला. यावेळी दिलीप दामले स्मृती पुरस्कार स्नेहम इंटरनॅशनलला, बसप्पा बाळप्पा कग्गनगी स्मृती पुरस्कार दीपक कन्स्ट्रक्शन्सला मधुकर विठ्ठल हेरवाडकर पुरस्कार हिताची मोटर्सला, माणिकबाग मोटर्स प्रा. लि. पुरस्कार पॅटसन ऑटोमोबाईल कंपनीला प्रदान करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी नितेश पाटील, गौरव अतिथी व्हीटीयूचे रजिस्ट्रार डॉ. आनंद देशपांडे यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रोहन जुवळी म्हणाले, व्यापार आणि उद्योग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा गौरव करण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. सर्व पुरस्कार विजेत्यांचे मी अभिनंदन करतो.

यावेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव प्रभाकर नागरमुन्नोळी, संचालक व निमंत्रित उपस्थित होते.

Tags: