Vijayapura

विजापूर जिल्हा इस्पितळ आवारात संशयास्पद मृतदेह

Share

विजापूर जिल्हा सरकारी इस्पितळाच्या आवारात आज एका व्यक्तीचा संशयास्पद अस्वस्थेतील मृतदेह आढळून आला.

विजापूर जिल्हा सरकारी इस्पितळाच्या आवारात विजापुरात गुमास्ते कॉलनीतील रहिवाशी शंभूलिंग धुंडगल रेवडीगार याचा मृतदेह संशयास्पद अस्वस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात हे पोलीस तपासनंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणी गांधी चौक पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tags: