Belagavi

उगार मध्ये २६ जून रोजी मराठी भजन स्पर्धा – स्मिताताई शिरगांवकर

Share

उगार येथील महिला मंडळ च्या माजी अध्यक्ष दिवंगत तारकाकी शिरगावकर यांच्या शताब्दी वर्षा निमित्त मराठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महिला मंडळाचे अध्यक्ष स्मिताताई शिरगावकर यांनी दिल्या.

उगारखुर्द येथे इन न्यूज वाहिणीला माहिती देताना म्हणाल्या सुमारे 80 वर्षापूर्वी पासून महिला मंडळाची स्थापना करण्यात आले आहे. उगार साखर कारखान्याच्या सहकार्याने महिला मंडळ विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवित आहे.
रविवार दिनांक 26 रोजी सकाळी दहा वाजता भजन गायन स्पर्धा पार पाडण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र कर्नाटकातून सतरा भजन संघांची नोंद झाली आहे.

यातील विजेत्या संघांना अनुक्रमे 8000, 6000,4000 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.
या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उद्योगपती अलका चितळे भिलवडी या उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. या भजन स्पर्धेत बेळगाव, निपाणी, सांगली, कोल्हापूर, सातारा परिसरातील महिला भजन संघ नावे नोंदवली आहेत. अशी त्या सांगितले.

Tags: