खून प्रकरणातील आरोपीने पोलिसावर धारदार हत्याराने हल्ला केल्याने आरोपीवर पोलिसांनी पायावर गोळ्या घालून अटक केली. ही घटना आज मंगळवारी पहाटे बेळगावातील वीरभद्रनगरातील एका हॉटेलजवळ घडली.

होय, काही महिन्यांपूर्वी बेळगावात गाजलेल्या रिअल इस्टेट एजंट राजू दोड्डबोम्मण्णावर याचा सुपारी घेऊन खून केल्याच्या प्रकरणात विशालसिंग चव्हाण हा प्रमुख आरोपी आहे. मंगळवारी पहाटे ३.३०च्या सुमारास वीरभद्रनगरातील कोयला हॉटेलजवळ तो असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एसीपी नारायण भरमणी यांच्या नेतृत्वाखालील पोलीस टीम त्याला अटक करण्यासाठी गेली होती.
यावेळी बाईकवरून पळ काढताना आरोपी विशालसिंग चव्हाणने एका पोलिसावर धारदार हत्याराने हल्ला चढविला. त्यामुळे एसीपी नारायण भरमणी यांनी त्याच्या पायावर २ गोळ्या झाडल्या. त्यानंतर विशालसिंग चव्हाणला अटक करून उपचारांसाठी जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. विशालसिंग हा मोस्ट वाँटेड गुन्हेगार असून अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणी बेळगाव, महाराष्ट्र पोलिसांना तो हवा आहे. या संदर्भात मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे.


Recent Comments