Belagavi

कोल्हापूरच्या शेफ्स किचन इन्स्टिटयूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु

Share

कोल्हापुरातील शेफ्स किचन इन्स्टिटयूट ऑफ कलिनरी आर्टस् अँड हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेत 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे विविध अभ्यासक्रम चालविले जातात.  कोल्हापूर आणि  जवळपासच्या जिल्ह्यातील विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी पुणे, मुंबई, गोवा, बेंगलोर या ठिकाणी जातात.

परंतु आता हॉटेल मेनेजेमेंटला प्रवेश घेण्यासाठी इतक्या लाांब जाण्याची आवश्यकता नाही. कारण पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असे तीन एकर शांत आणि निसर्गरम्य वातावरणात आधुनिक रचनेचे कॉलेज कॅम्पस असलेले शेफ्स किचन इन्स्टिटयूट ऑफ कलिनरी आर्टस् अँड हॉटेल मॅनेजमेंट, कोल्हापूर या महाविद्यालयाने पश्चिम महाराष्ट्रातील विध्यार्थ्यांना शिकण्याची संधी किंवा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.हे महाविद्यालय महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त असून, युनिव्हर्सिटी मान्यताप्राप्त व एन. सी. वी. टी. ई. अंतर्गत हॉटेल मॅनेजमेंटचे थेअरी व प्रॅक्टिकलचे विविध अभ्यासक्रम चालवत आहे. आजवर या महाविद्यालयाने अकरा वर्षांमध्ये हजारो विध्यार्थ्यांचे करिअर घडविले आहे. येथील विद्यार्थी देशात व प्रदेशात  स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट, केटरिंग, क्रूज शिप, एअरलाइन्समध्ये नोकरी करत आहेत. या महाविद्यालयातील ऐंशी  विद्यार्थ्यांची निवड  2021 मध्ये परदेशातील  ‘कतार’ या ठिकाणी झालेल्या फिफा फ़ुटबाँल कप, कतारसाठी झाली होती.

तेथे त्यांनी यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांनी केलेल्या कामगिरीच्या जोरावर या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या फिफा फ़ुटबाँल वर्ल्ड कपसाठी  शेफ्स किचन इन्स्टिटयूट ऑफ कलिनरी आर्टस् अँड हॉटेल मॅनेजमेंटच्या 250 हून अधिक विद्यार्थ्यांची परदेशात जाऊन नामांकित हॉटेल व केटरिंग कंपनीमध्ये ट्रेनिंग करण्यासाठी निवड झाली आहे. शेफ्स किचनमध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विध्यार्थ्यांना देशात व परदेशातही खूप मागणी आहे. कारण या संस्थेमध्ये शिक्षणाबरोबरच चाांगले प्रशिक्षणही दिले जाते. महाविद्यालयामध्ये प्रशस्त ट्रेनिंग किचन, फ्रंट ऑफिस, ट्रेनिंग रेस्टॉरंट, हाऊसकिपींग, कुकिंग शोसाठी स्टुडीओ किचन व संगणक लॅब आहेत. त्यामध्ये तज्ज्ञ शेफ्स , प्राध्यापक व प्रशिक्षक विध्यार्थ्यांना मोलाचे शिक्षण देत आहेत.

तसेच शिक्षणाबरोबरच विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन शेफ्स किचन युथ फेस्टिवलमार्फत केले जाते. हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विध्यार्थ्यांना आजच शेफ्स किचन इन्स्टिटयूट ऑफ कलिनरी आर्टस् अँड हॉटेल मॅनेजमेंट, मेनन अँड मेनन जवळ, शाहू मार्केटयार्ड, उचगाव, कोल्हापूर येथे भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीकरिता  81 81 00 94 94 व किंवा 81 81 0 0 95 95 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन शेफ्स किचनतर्फे डायरेक्टर शेफ देव कसलकर यांनी केले आहे.

Tags: